Dapoli दापोली : मोटारसायकल चोर गजाआड

banner 468x60

अज्ञात आरोपीने फिर्यादी दिपेश मारुती पवार (रा. शिवाजीनगर किरांबावाडी, ता. दापोली जि.रत्नागिरी) यांची ड्युएट गाडी क्र.एम.एच.०८ ए.एस. ३१०२ स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.

banner 728x90 banner 728x90

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पेट्रोलिंग दरम्यान सुफियान अस्लम महाते, (वय-२५ वर्षे, रा. मांदिवली मोहल्ला) हा सदर गाडीसह संशयीतरित्या मिळून आला.

त्याचेकडे चौकशी करीता त्याने सदरची ड्युएट गाडी स्वतःच्या फायद्यासाठी चोरल्याची कबुली दिलेली आहे.

आरोपी सुफियान अस्लम महाते याचे ताब्यातून गाडी जप्त करण्यात जप्त करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सुफियान महातेची रवानगी पोलीस कस्टडीमध्ये करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/727 गायकवाड, पोना/1523 नलावडे, पोकॉ/345 मोरे यांनी केली. वरीलप्रमाणे दाखल गुन्ह्याचा अधिक तपास आर. टी. नलावडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *