दापोली : जुगारातील उधारीवरून रॉकेल ओतून ट्रॅव्हल्स गाडी पेटविण्याचा प्रयत्न

banner 468x60

दापोली शहरात पत्त्यांच्या जुगारातील उधारीवरून एकाला मारहाण झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल झाली नसली तरी याची चर्चा मात्र दापोली शहरात जोरदार आहे.

या घटनेत काहींनी रॉकेल ओतून ट्रॅव्हल्स गाडी पेटविण्याचा प्रयत्न देखील केला होता, अशी चर्चा आहे.

याबाबत दापोली शहरात चर्चेतून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील बसस्थानक पासून काही अंतरावर आमराईत पत्यांच्या तीन पानी जुगाराचा क्लब आहे.

खुलेआम सुरू असलेल्या या क्लबकडे पोलीस दुर्लक्ष करताना दिसत असून आता गाडी पेटविण्या इतपत बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांची मजल गेली आहे.

विजापूरमधील एक खाजगी ट्रॅव्हल चालक हा काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी तीन पानी पत्यांच्या जुगार खेळला होता. दरम्यान याची माहिती पोलीसांना असूनही कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *