कर्तव्यावर असलेल्या पोलिसाशी हुज्जत घातल्याप्रकरणी 4 जणांना न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अनिल अण्णाप्पा लक्ष्मण माने, शिवाजी शहाजी लक्ष्मण माने, रमेश पप्पू दत्तू नलावडे, चेतन भीमसेन नलावडे (सर्व राहणार नवानगर ता. दापोली) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
दापोली येथे पोलीस शिपाई कर्तव्य बजावत असताना अनिल माने, शिवाजी माने, रमेश नलावडे, चेतन नलावडे यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीनी न्यायालयांसमोर गुन्हा कबूल केल्याने त्यांना (प्ली बारगनींग) CRPC-कलम – 265(E) प्रमाणे दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये एकूण रक्कम 12000/-रुपये ही पिडीत याला नुकसान भरपाई म्हणून देणची शिक्षा सुनावली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















