दापोली : नॅशनलच्या माज हमीद देसाईंची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या विभागस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या माज हमीद देसाई याची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

विभागीय स्पर्धेमध्ये नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज दापोलीच्या माज हमीद देसाई याने 19 वर्षाखालील कॅरम स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. आता तो आपल्या विद्यालयाचं राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे.

त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे गव्हर्निंगबॉडी चेअरमन लियाकत रखांगे, सेक्रेटरी इकबाल परकार, कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी माज व त्याचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक अशफाक खान यांचे अभिनंदन करत पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *