दापोली : कुडावळे देवखोलवाडीत बिबट्याची दहशत

banner 468x60

दापोली तालुक्यातील कुडावळे देवखोलवाडीत बिबट्याची दहशत वाढली असून दिवसाढवळ्या बिबट्याचा संचार वाढला आहे.

गेल्या १५ दिवसांत २ गायींसह २ बोकड आणि एका बकरीला ठार मारून बिबट्याने फडशा पाडला असल्यामुळे येथील रहिवाशांना आपल्या घराबाहेर पडण्यास भीती वाटत आहे. दापोली तालूक्यातील कुडावळे देवखोल वाडीत भर दिवसा बिबट्याचा संचार वाढला असून या बिबट्याने आपला मोर्चा पाळीव प्राण्याकडे वळविला आहे.

banner 728x90 banner 728x90

याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला देऊनसुद्धा वन विभागाचे अधिकारी बिबट्याला पिंजरा लावून पिंज-यात पकडण्याऐवजी केवळ बघ्याचीच भूमिका घेत आहेत. कुडावळे येथील देवखोलवाडीत राहणाऱ्या सुरेश भुवड यांच्या एका जर्सी गायीला,

नितिन करंजकर यांच्या एका बक-याला, महेंद्र पांढरे यांच्या एका बक-याला आणि एका बकरीला तर प्रताप पांढरे यांच्या गायीला बिबट्याने ठार मारले. या सर्व घटना मागील पंधरा दिवसापासून घडत आहेत.

ज्यांच्या पाळीव प्राण्यांना मारले ते सर्व गरीब शेतकरी आहेत. बिबट्याच्या वाढलेल्या वावरामुळे देवखोल वाडीतील लोक भीतीच्या छायेखाली वावरत असून त्यांना दिवसाही घराबाहेर पडण्यास भीती वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *