दापोली तालुक्यातील टाळसुरे-तेलीवाडी गैरसमजातून पती- पत्नीवर कोयेतीने वार करणार्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवार 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा.घडली. अमोल थोरे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
त्याच्या विरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार,हे सर्व एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्या जमिनीवरुन वाद सुरु आहेत. दरम्यान,गुरुवारी टाळसुरे-तेलीवाडी येथील ग्रामस्थ वाडीतील रस्याच्या दुतर्फा असलेली झाडी तोडत होते.
तेव्हा अमोर थोरे याने ठेवलेल्या त्याच्या सेंट्रिंगच्या लाकडांवर वाडीतील ग्रामस्थांनी तोडलेल्या झाडांच्या फांद्या पाहून त्या फांद्या मिलिंद थोरे यानेच टाकल्याचा अमोलचा गैरसमज झाला.
या रागातूनच मिलिंद थोरे आणि त्याच्या पत्नीने तयार केलेली आंबा कलम अमोल कोयतीने तोडून नुकसान करु लागला. मिलिंद थोर आणि त्यांची पत्नी अमोलला थांबवण्यासाठी गेले असता
अमोलने मिलिंदच्या डोक्यात आणि त्याच्या पत्नीच्या उजव्या हाताच्या बोटावर मारुन दुखापत केली.याप्रकरणी अमोल विरोधात भादंवि कायदा कलम 324,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*