चिपळूण : दहावीच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग, मोबाईलमधून अनेक गोष्टी उघड

banner 468x60

सावर्डे परिसरातील दहावीच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा गंभीर प्रकार घडला आहे. मुंबईच्या एका तरूणाने गावी मित्राच्या घरी तिला जबरदस्तीने नेऊन हा प्रकार केला.

या अतिप्रसंगामुळे ती मुलगी बेशुद्ध पडली. तिला तिथेच टाकून तो तरूण पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला शोधून बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्यावर बाल लैंगिक शोषण (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

सावर्डेचे पोलिस निरीक्षक जयवंत गायकवाड यांनी या बाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, दहावीत शिकणाऱ्या एका मुलीचा मोबाईल नंबर मूळचा आरवली परिसरात राहाणाऱ्या मात्र सध्या मुंबई वास्तव्यास असणाऱ्या तरूणाने मिळविला. तिला तो कायम संपर्क करीत होता.

ती मुलगी त्याचा फोन टाळत असे. मात्र, तरीही तो सतत फोन करीत होता. अखेर नाईलाजाने त्याचा फोन तिने स्वीकारला. तो सातत्याने तिला, तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगत असे. मात्र, ती मुलगी त्याला दाद देत नव्हती. मुंबईहून तो १३ डिसेंबरला सावर्डे परिसरात दाखल झाला.

त्याने त्या मुलीला फोन करून गयावया करीत घराबाहेर बोलावून घेतले आणि जबरदस्तीने गाडीवर बसवून आपल्या मित्राच्या घरी आणले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग केला. यात ती मुलगी जागीच बेशुद्ध पडली. तिला तिथेच टाकून त्या तरूणाने पलायन केले. दीड-दोन तासानंतर ती शुद्धीवर आल्यानंतर घरी गेली. घाबरलेल्या मुलीला पाहून वडील व नातेवाईक हादरून गेले. तिने ओढवलेला प्रसंग सांगितला.

त्यानंतर गुरूवारी सकाळी तिचे नाईवाईक तिला घेऊन सावर्डे पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान या तरूणाच्या मोबाईलमधून अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *