गोगटे जोगळेकर महाविदयालयात नुकत्याच झालेल्या जीएस पदाच्या निवडणुकीमध्ये युवा सेनेचा सक्रिय सदस्य कुणाल कवटेकर याने दणदणीत विजय मिळवला.
हा विजय माझ्या एकट्याचा नसून सर्व सहकार्यांचा व युवासैनिकांचा आहे, अशी प्रतिक्रिया कुणालने विजयानंतर व्यक्त केली. महाराष्ट्र कॉलेज कक्ष निरीक्षक अथर्व साळवी, युवासेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, तालुका प्रमुख प्रसाद सावंत ह्यांचा मार्गदर्शनाखाली कॉलेज कक्ष तालुका प्रमुख पारस साखरे गोगटे कॉलेज युनिटचे अध्यक्ष अमन राणे मेहनत घेतली.
कुणाल याला 17, कौशल मोहिते याला 15 तर आर्या जोगळेकरला 5 मतं मिळाली. गोगटे कॉलेजचे माजी अध्यक्ष स्वराज साळुंखे, युनिटचे उपाध्यक्ष चिन्मय पोइपकर, सचिव
साहिल कांबळे, सहसचिव निहाल सुर्वे, पवन भारती, सर्वेश पाटील आणि सर्व सदस्य तसेच कॉलेज युनिटच्या उपतालुका प्रमुख नुपुर आचरेकर या सर्वांच्या प्रयत्नांमुळे गोगटे कॉलेजवर भगवा फडकवणे शक्य झाले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













