सध्या प्रत्येकाच्या फीडमध्ये किंवा स्टोरीजला एकच गाण वाजतंय ते म्हणजे ‘मन वाजतया…’. या गाण्याची गायिका राधिका भिडे हिचे जोरदार चर्चा होत आहे. राधिका भिडे कोण? की काय करतेय पाहूया. सोशल मीडियावर गायिका राधिका भिडे ‘आय पॉपस्टार’शोमुळे चर्चेत आली आहे. या कार्यक्रमात तिने गायलेलं मराठी गाणं सगळ्यांचा पसंतीला पडलं आहे.
‘आय पॉपस्टार’ या कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरली मराठमोळी गायिका आणि कोकणकन्या राधिका भिडेची. ‘मन धावतया’ हे गाणं संगीतप्रेमींच्या पसंतीला पडत आहे. राधिका भिडे हे कोकणकन्या आहे. योजक उद्योजकांची दुसरी कन्या राधिका भिडे आहे. तसेच राधिका भिडेची मोठी बहिण शमिका भिडे आहे. ती देखील गायिका आहे. राधिका भिडे ही मुंबईतील एक लोकप्रिय संगीतकार, गायिका, गीतकार, पियानिस्ट, कीबोर्डिस्ट, संगीत दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहे.
ती मराठी आणि इंग्रजी संगीत क्षेत्रात सक्रिय असून, भावनिक आणि मधुर गाण्यांसाठी ओळखली जाते. राधिका भिडेच्या संगीतात पारंपरिक मराठी स्वाद आणि आधुनिक पॉपचा मेळ आहे.राधिकाने के. एम. म्युझिक कन्सर्व्हेटरी, रॉक स्कूल लंडन आणि इनर व्हॉइस स्टुडिओज येथे शिक्षण घेतले. तिच्याकडे संगीत क्षेत्रात सहा वर्षांचा अनुभव आहे. राधिका भिडेने फिल्म स्कोरींग, अॅरेंजमेंट आणि प्रोडक्शन केले आहे. तिची पहिली ओळख “मन धावतया” सारख्या मराठी गाण्यांमधून झाली.
आय-पॉपस्टार ही एक नवीन भारतीय संगीत रिअॅलिटी शो आहे, ज्यात तरुण गायक-कलाकार आपली प्रतिभा दाखवतात. ही शो वॉर्नर म्युझिक इंडियाने लाँच केली असून, जजेसमध्ये किंग (किंग रोहन), परमिश वर्मा, आस्था गिल आणि आदित्य रिखारी यांचा समावेश आहे. राधिका ही आय-पॉपस्टार सीझन 1 ची एक प्रतिस्पर्धी आहे. तिने एपिसोड 2 मध्ये “मन धावतया” हे मराठी गाणे गायले, ज्याने जजेस आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. राधिका भिडेच्या सोल्फुल आवाजाने किंगला भावुक केले.
तिच्या मराठी जादूने शोला खास टच दिला, आणि ती शोची सुरुवातीपासूनच स्टार ठरली आहे. ‘मन धावतया’ या गाण्याला कार्यक्रमाच्या मंचावर आणि सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तो प्रतिसाद एवढा आहे की, इन्स्टाग्रामवर माझे 19 हजार फॉलोअर्स होते, ते आता 86 हजारांच्या वर गेले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















