सोन्याचा व्यावसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याने चिपळूण बाजारपेठेतील खेराडे कॉम्प्लेक्समधील एका सराफाची २५ लाखाची फसवणूक केल्याची घटना ६ जून ते १३ जुलै २०२२ या कालावधीत घडली.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व आरोपी हे सोन्याचे व्यापारी असून फिर्यादी व आरोपीत यांचे व्यावसायिक संबंध होते.
सदर संबंधामधून फिर्यादी कृष्णेंदु मुकुल मोंडल (वय २८, रा. चिपळूण रोड, चिपळूण, मुळ रा. मौजे कोलाघाट, पूर्व मेदनीपूर, कोलकाता) यांनी संशयित मेघनाथ हाडा (रा. लिला गोल्ड, चौका बिल्डिंग, भाजी गल्ली मुंबई) यांच्याकडून ५०० ग्रॅम सोने खरेदीसाठी २५ लाख रुपये आरटीजीएस व एनईएफटीद्वारे पाठवले होते.
६ जून ते १३ जुलै २०२२ दरम्यान बाजारपेठेतील खेराडे कॉम्प्लेक्स येथे प्रणव सोने खरेदीच्या दुकानात हा व्यवहार झाला होता. व्यवहारानंतर या सोने खरेदीचा व्यवसाय पूर्ण करण्यास संशयिताने टाळाटाळ केली. त्यामुळे व्यापारी मोंडल यांची फसवणूक झाली.
याबाबत ११ नोव्हेंबरला चिपळूण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













