सावकारीच्या पाशातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी आता उपनिबंधक कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या सावकरांकडे पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे. नुकतीच अटक केलेल्या निलेश कीर यांच्या समवेत अन्य तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश कीर यांच्या विरोधात करबुडे येथील एका तरुणांने तक्रार दाखल केली आहे.
व्यवसायाने रिक्षा चालक असलेल्या जयवंत कळंबटे यांच्याकडून वीस हजारांच्या कर्जांच्या बदल्यात निलेशने लाखो रुपये उकळत त्यांची 7.5 एकर जागा स्वत:च्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

आता पर्यंत तिघांना या गुन्हात अटक करण्यात आली आहे. तर निलेश कीरने रत्नागिरी तालुक्यात सुमारे 50 कोटींच्या कार्जाचे वाटप केल्याचा पोलीसांचा अंदाज असून त्या दृष्टीने तपास सुरु करण्यात आला आहे. सावकारीचे लोन मोठ्याप्रमाणात रत्नागिरी शहरासह तालुक्यात पसरले आहे.
काही व्यक्ती बँकेतून कर्ज घेऊन पैसे उचलत असून तेच पैसे सावकारी धंद्यातही वापरत असल्याची माहिती पुढे आली आहे. रत्नागिरी शहर पोलिसांकडे दाखल झालेल्या प्रकरणात निलेश कीर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याविरोधात आणखी एक तक्रार पोलिसांकडे आली आहे.
तर निलेश कीर यांच्या समावेत अरुण बेग, राजेंद्र बाळकृष्ण इंदुलकर सह एका महिलेचा समावेश आहे. रविवारी निलेश शिवाजी कीर याला अटक केल्यानंतर त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर अरुण बेग सह एका महिलेला सोमवारी पोलीसांनी अटक केली आहे. एक लाखाच्या बदल्यात 2 लाख 24 हजार देवूनही चौघेजण त्यांच्याकडे 3 लाख 80 हजारांची मागणी करत होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















