लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महायुतीच्या मेळाव्याच्या तयारीचे आयोजन 14 जानेवारीला रत्नागिरी येथे करण्यात आला आहे.
अशातच नवीन राजकीय पक्षाची घोषणा मुंबई येथे अलिकडेच झाली. आता नव्याने स्थापन झालेल्या ‘कोकण प्रादेशिक’ या राजकीय पक्षाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे.
रत्नागिरी येथील सावंत पॅलेस या रिसॉर्टचे मालक शकील सावंत यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोकणातून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या 2024 च्या निवडणुकीसाठी कोकण प्रादेशिक पक्षातर्फे शकील सावंत यांची उमेदवारी अॅड ओवेस पेंचकर यांच्याकडून रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.
आपण गेले 20 ते 25 वर्षे कोकणाची परिस्थिती बघतोय. केंद्र व राज्य शासनाकडून कोकणाला कॉर्नर करण्याचे काम होत असल्याचा आरोप यावेळी पेचकर यांनी केला आहे.
रत्नागिरी, लांजा, चिपळूण येथील एसटी डेपोचे कामही अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. कोकणात पर्यटन हा मुख्य विषय आहे. मात्र पर्यटनाच्याअनुषंगानेही विकास होत नाही. मुंबई-गोवा महामार्गाची असलेली परिस्थिती, असे अनेक प्रश्न कोकणाचे प्रलंबित आहेत.
पण सरकार कोकणाकडे लक्ष देत नसल्याची टीका कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक ओवेस पेंचकर यांनी केली.
आपल्याला कोकणासाठी पर्यटन, उद्योग, रोजगार यामध्ये मोठे काम करायचे आहे. प्रत्येक तालुक्यात मोठे हॉस्पिटल उभे करायचे आहे.
यासाठी आपल्याला सगळ्या जनतेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन उमेदवार शकील सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले. कोकणाला विकासाच्या दृष्टिकोनातून कोपऱ्यात ठेवण्यात आले. मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नावर आम्ही जनहित याचिका दाखल केली.
आमच्या पक्षाला काहीतरी चांगला बदल घडवायचा आहे. कोकणात चांगली विकासकामे करून दाखवायची आहेत. हे सगळे करीत असताना आम्हाला कुणावरही टीका करायची नाही, असेही ओवेस पेंचकर यांनी यावेळी नमूद केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















