Ratnagiri रत्नागिरी : ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल; आरोपी म्हणून पत्नी आणि मुलाचा उल्लेख

banner 468x60

एसीबीच्या चौकशीनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा ११८ टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे आरोपपत्रात त्यांच्या पत्नी, मुलगा यांच्या नावाचा देखील नावाचा समावेश आहे. त्यामुळे साळवी अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

(Case registered against thackeray mla Rajan Salvi Mention of wife and son as accused acb) साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने आता पुढील कोणती कारवाई होईल याकडे लक्ष असणार आहे. आज सकाळी एसीबीच्या टीमने राजन साळवी यांच्या घरावर धाड टाकली होती.

दोन तासांपासून त्यांच्या घराची झाडाझडती सुरु आहे. अनेक अधिकारी त्यांच्या घरी चौकशीसाठी आले आहेत. साळवी यांच्या संपत्तीची माहिती अधिकारी घेत आहेत. दुसरीकडे, राजन साळवी यांचे समर्थक त्यांच्या घराजवळ जमा झाले आहेत.

राजन साळवी यांनी एसीबीच्या धाडीनंतर प्रतिक्रिया दिली होती. राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात येत आहे. मी काय आहे हे माझे कुटुंब आणि जनतेला माहिती आहे. अशी कारवाई होईल याची मला कल्पना होती.

पण, मी शांत आणि संयमी आहे. अटक झाली तरी माझी तयारी आहे. काहीही झालं तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. त्यांच्यासोबत गेल्याने त्रास सहन करावे लागेल याची माहिती होती, असं साळवी म्हणाले. (Salvi’s reaction on ACB enquiry) साळवी यांची एसीबीने याआधी सहावेळा चौकशी केली आहे.

साळवी यांच्या पत्नी, मुलगा, भाऊ, पुतणे यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. साळवी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संपत्तीचे मूल्यांकन केले जात आहे. आरोपपत्रानुसार त्यांनी दाखवलेल्या संपत्तीपेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे.

सध्या त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांच्या घराची झाडाझडतीचे काम सुरुच आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसीबी काय कारवाई करते हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *