BREKING दापोली : माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार, कोकणात ठाकरे गटाला आणखी एक धक्का

banner 468x60

दापोलीतील राजकारणातील एक मोठी बातमी समोर येतेय दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉइन

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

उद्या १ फेब्रुवारीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र अखेर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.

उद्या १ फेब्रुवारीला हा पक्षप्रवेश मुंबईमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी १ वाजता होणार आहे, फेब्रुवारी महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत दापोलीत जाहीर सभा होणार असल्याची माहिती रत्नागिरी उत्तर जिल्हाअध्यक्ष केदार साठे यांनी कोकण कट्टा लाईव्ह न्यूजला दिली आहे.

त्यामुळे दापोलीतील राजकीय गणितं बदलणार आहेत. दापोली विधानसभा मतदार संघाचे सलग २५ वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या सूर्यकांत दळवी यांचा शिवसेनेतूनच राष्ट्रवादीत गेलेल्या संजय कदम यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केल्यानंतर पहिले काही महिने सूर्यकांत दळवी राजकीय विजनवासात गेले होते.

त्याचा फायदा घेऊन शिवसेनचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पुत्र योगेश कदम यांना दापोली विधानसभा मतदार संघात लाँच केले होते. सूर्यकांत दळवी हे दापोलीचे माजी आमदार आहेत.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर बुवाबाजीचा आरोप केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *