वाळू उत्खन रोखण्यासाठी एकीकडे महसूल अधिकाऱ्यांवर हल्ले होत असताना दुसरीकडे मात्र महसूल वाळूचा पैसा खात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
बहिरवली गावात हा प्रकार समोर आला आहे.आम्ही याबाबत खेड महसूल यांना संपर्क केला मात्र संपर्क झाला नाही. त्यांची सविस्तर प्रतिक्रिया आणि बाजू मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू.
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागामध्ये बहिरवली गावच्या हद्दीमध्ये ड्रेझरच्या माध्यमातून रात्र दिवस विना परवाना वाळू उत्खनन होत असल्याने जनतेतून जोरदार ओरड होत आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्याना निवेदन देण्यात येणार आहे.
ड्रेझरच्या माध्यमातून वाळू उत्खनन करण्यासाठी शासनाची बंदी असतानाही काही व्यावसायिक महसूल खात्याला डावलून विनापरवाना वाळू उत्खनन करीत आहेत. प्रत्यक्षात ज्या ड्रेझरला परवानगी आहे त्या ड्रेजर व्यावसायिकांनी पहाटे सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ड्रेजर चालवण्याची शासनाची परवानगी असते.
मात्र काहींची परवानगी संपली असूनही रात्रंदिवस ड्रेझर चालू आहेत. त्यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सोसावे लागत आहे. वाळूचे मोठ मोठे डंपर खेड बहिरवली, संगलट मार्गावरून सुमारे २०० हून अधिक धावत आहेत.
वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाकडे कोणतीच रॉयल्टीची पावती नसतानाही वाहतूक कशी होते असाही एक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वतः महसूल यावर काय कारवाई करेल पाहावं लागेल.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*