दापोली : अखेर संख्या गुरुप्रसाद पोवार यांचा भाजपमध्ये प्रवेश Dapoli Sankhya guruprasad Powar finally joins BJP

Dapoli Sankhya guruprasad Powar finally joins BJP

banner 468x60

राष्ट्रवादी काँगेस पवार गट रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन संख्या गुरुप्रसाद पोवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. या पक्षप्रवेशावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

संख्या पोवार यांच्या पक्षप्रवेशामुळे दापोली भाजपला बळ मिळणाराय. लोकसभेच्या निवडणुकीत जिल्हा पातळीवर फेरबदल पाहायला मिळत आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दापोली दौरा केल्यानंतर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत.

येणाऱ्या निवडणुकीत भाजपने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलीय. याची सुरुवात दापोली आणि चिपळूण, रत्नागिरीमधून झालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *