दापोली : ‘साई रिसोर्ट’मध्ये साहित्याची चोरी

banner 468x60

मुरुड येथील बहुचर्चित असलेल्या साई रिसोर्ट मधील सुमारे १ लाख २ हजार ८०० रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल झाली.

banner 728x90 banner 728x90

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेले अनेक दिवस मुरुड येथील साई रिसोर्ट बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्याने या रिसोर्टच्या रिसेप्शन हॉलच्या सामोरील खोलीच्या गॅलरीमध्ये प्रवेश केला.

गॅलरीच्या स्लायडिंगची खिडकी उचकटून आत प्रवेश करून ६० हजार रुपये किमतीची ३ हजार मीटर पीव्हीसी वायर, ३० हजार रुपये किमतीचे एसी करिता वापरलेले १ हजार ७०० फूट लांबीचे तांब्याचे पाईप, ६ हजार ४०० रुपये किमंतीचे वाथरूममध्ये बसवलेले १६ नळ, ६ हजर ४०० रुपये किमतीचे बाथरूममध्ये बसवलेले १६ शॉवर असा एकूण १ लाख २ हजार किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.

रोहन अशोक केळसकर यांनी या चोरीची दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक यादव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *