Breaking News
रत्नागिरी : गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड, दापोली व खेड येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी शासनाची मंजुरी 30 कोटींच्या निधीस मंजुरी; ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्णय – राज्यमंत्री योगेश कदम दापोली : 7/12 उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)ला रंगेहात अटक, लाच घेण्यात महिला अधिकारीही मागे नाहीत, सततच्या लाच मागणीला कंटाळून तक्रार दाखल रत्नागिरी : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेची सोन्याची चेन लुटली खेड : पंचायत समिती कार्यालयात हृदयविकाराचा झटका, चिपळूण येथील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

दापोली : आडे-उटंबर पूल अवजड वाहनांना बंद

banner 468x60

दापोली तालुक्यातील आडे-उटंबर या दोन गावांना जोडणाऱ्या आणि वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे,

banner 728x90 banner 728x90

या पुलावरील दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ५ टनावरील अवजड वाहनांसाठी या पुलावरून होणारी वाहतूक बंद ठेवली आहे.


सागरी महामार्गावरील तालुक्यातील वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा मार्ग असलेल्या दापोली, आंजर्ले, आडे, उटंबर, केळशी, मांदिवलीमार्गे मंडणगडकडे जाणाऱ्या मार्गावरील आडे आणि उटेंबर या दोन गावांना जोडणारा उटंबर खाडीवरील पुलाची दुरुस्ती वर्षभर सुरू आहे.

या पुलाच्या बेरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी महिनाभर लागणार आहे. या पुलावरून होणारी ५ टनावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

दुरुस्तीच्या कामाची माहिती देताना संरचना स्ट्रक्चरल स्ट्रेन्थनिंग सर्व्हिसेस या कंपनीचे प्रोजेक्ट इन्चार्ज लखन सत्तीकर म्हणाले, ‘आडे खाडीपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीचे काम कंपनीला दिले.

यात पुलाचे बेरिंग बदलणे, वेलकैप दुरुस्त करणे, पिअर दुरुस्त करणे व पुलाचे बळकटीकरण करणे या कामांचा समावेश आहे. यापैकी पुलाचे बेरिंग बदलणे हे काम बाकी असून, उर्वरित सर्व कामे पूर्ण झाली आहेत.

बेरिंग बदलण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. यासाठी या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असून, केवळ हलक्या वाहनांना या पुलावरून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. जेव्हा बेरिंग बदलण्याचे काम सुरू असेल तेव्हा सर्व वाहतूक थोड्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.


आडे खाडीवरील पुलाचे बांधकाम शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना मंजूर झाले होते. सर्वसाधारणपणे १० ते १५ वर्षानंतर या पुलाची बेरिंग बदलावी लागतात व पुलाचे आयुष्य वाढण्यासाठी त्याची दुरुस्तीही करावी लागते. त्यामुळे हे काम हाती घेण्यात आल्याची माहिती उपविभागीय अभियंता कदम यांनी दिली.


एसटीला ठराविक वेळेत परवानगी
सध्या बारावी परोक्षा सुरू असल्याने केळशी येथून दापोली परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी एसटीला या पुलावरून जाण्यासाठी परवानगी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता कदम यांनी दिली.

आडे खाडीपुलाबरोबरच आंजर्ले खाडीपुलाच्या दुरुस्तीचेही काम करण्यात आले असून, आडे येथील काम पूर्ण झाल्यावर आंजर्ले खाडीपुलाची बेरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने तो पूलही काही दिवस अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *