दाभोळ : भाजप कार्यकर्त्यांचा भाजपला “रामराम” !

banner 468x60

राजस मुरकर, प्रतिनिधी, कोकण कट्टा लाईव्ह

दाभोळ येथील सागरपुत्र संस्थेच्या सभागृहामध्ये भाजपाचे खंदे समर्थक श्याम दाभोळकर यांनी आपल्या 186 सहकाऱ्यांसह विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला.

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi


पक्ष प्रवेश करणार्या सर्वांचाच यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नाराजीचे नेमके कारण काय असे विचारले असता श्याम दाभोळकर यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्याचे नाव न घेता त्यांच्या हम करे सो कायदा अशा वागणूकीचा तसेच कार्यकर्त्यांच्या होणार्या खच्चीकरणाचा उल्लेख केला.

यावेळी वरिष्ठांकडून सहकार्याच्या अपेक्षांची पूर्तता होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपण करत असलेला पक्ष प्रवेश हा कोणत्याही अमिषाला भुलून नाही तर आमदार योगेश कदम करत असलेल्या विकास कार्यांवर प्रभावित होऊन करत आहोत असे दाभोळकर यांनी सांगितले.


यावेळी आमदार योगेश कदम यांनी पक्षप्रवेश करणार्या सर्वांचेच स्वागत केले व त्यांचे आभारही मानले. आपल्या विधानसभा क्षेत्र परिसरात झालेल्या तसेच होत असलेल्या विकास कामा संबंधीची माहिती दिली. कोकाकोला कंपनीचा देशातील सर्वात मोठा प्लांट लोटे – खेड येथे होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

केळशी खाडी पुलाचे टेंडर निघालेले आहे. तसेच बाणकोट खाडी पूल आणि दाभोळ खाडी पुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल याची त्यांनी ग्वाही दिली. सरते शेवटी लोकहिताच्या कोणत्याही कामासाठी मी तुमच्या समवेत असेन असे आश्वासनही त्यांनी दिले.


यावेळी कार्यक्रमास दाभोळ गटातील, दापोली तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *