स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)अंतर्गत दाभोळ ग्रामपंचायतची स्वछता मोहीम राबवण्यात आली. गावाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ गाव , सुंदर गाव , माझं गाव अभियान राबविण्यात आले.
गावात स्वच्छता मोहीम राबवुन स्वच्छ गाव सुंदर गाव बनविण्यासाठी ही स्वछता मोहीम हाती घेतलीय. पावसाळ्यापूर्वी दाभोळ बाजारपेठ, दाभोळ धक्का, शाळा

परिसर, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचा परिसर, पर्यटन स्थळ, बसस्थानक ग्रामपंचायत परिसरात ही स्वछता करण्यात आली.
ही मोहीम आदर्श असून ती महाराष्ट्राला दिशा देणारी ठरू शकते, जेव्हा ध्येयाने प्रेरित होऊन लोक एकत्र येतात त्यावेळी क्रांती घडत असते आणि असेच स्वच्छतेबाबतची क्रांती दाभोळमध्ये घडतांना दिसून आली.
यावेळी गावचे सरपंच, महिला बचतगट , ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, गावातील युवक स्वच्छ गाव सुंदर गाव बनविण्यासाठी मोहीम हाती घेतलीय.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*