खेड : पाटबंधारे विभागाच्या जागेवर अनधिकृतपणे लागवड शिरगाव ग्रामस्थ सागर भोसले यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार

banner 468x60

खेड तालुक्यातील मोंजे शिरगांव येथील लघु पाटबंधारे विभागाच्या जागेत भाजीपाला व फळभाज्यांचे उत्पन्न घेरून अनंत भोसले शासनाची फसवणक केल्याची तक्रार सागर भोसले यांनी राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

banner 728x90 banner 728x90

या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कायदेशीर
कारवाई करावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.
सागर भोसले यांनी तक्रारीत म्हटले आहे की, खेड तालुक्यातील माँजे शिरगांव बागवाडी येथील ग्रामस्थ यांनी

लघु पाटबंधारे विभागाची जमीन मिळकत सव्र्व्हे नं.९१ मधील आठ एकर जमीनीवर भाजीपाला, कलिंगड हापूस आंब्याची कलमे, सुपारीची झाडे तसेच वांगी मिरची लागवड करून गेली वीस वर्षे विनापरवाना, बेकायदेशीर उत्पन्न घेत आहेत.

तसेच येथे गुरांचा गोठा बेकायदेशीर बांधलेला आहे. त्याचेही उत्पन्न घेत आहेत. यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही किंवा कायदेशीर भरलेली नाही.

ग्रामस्थाने पिके आणि बाग दाखवून पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत मिळणारे अनुदान व कायदे
घेतले असून आताही घेत आहे.

त्यामुळे त्यांनी शासनाची जागा वापरून शासनाची फसवणूक केली आहे. तसेच शासनाच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवैधरित्या विनामोबदला फसवणूक केली बाहे त्याच्यांवरही कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *