खेड : मुंबई-गोवा महामार्गावर कारची धडक; दुचाकीस्वार जखमी

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर भरणे येथे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला कारने दिलेल्या धडकेत दुखापत झाली आहे. हा अपघात गुरुवार (दि. ६ नोव्हेंबर) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, शंकर भीमराव भोसले (वय ४०, रा. तिसंगी, ता. खेड) हे आपल्या दुचाकीवर (क्रमांक एम.एच.०८ बीडी ३१०२) प्रवास करत होते. दरम्यान, मुंबईवरून खेडच्या दिशेने येणाऱ्या कारने (क्रमांक एम.एच.४७ बीबी ८२४७) काळकाई एजन्सीजजवळ दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.


या धडकेत भोसले हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावर थांबला असल्याचे समजते.
दरम्यान, या अपघाताची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *