खेड : क्रेनच्या धडकेत लांजातील तरुण जखमी

banner 468x60

मुंबई–गोवा महामार्गावरील लोटे येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोर क्रेनची धडक बसून झालेल्या अपघातात दत्ताराम बाबू मोहिते (वय ३०, रा. डफळेवाडी, ता. लांजा) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. या अपघातप्रकरणी क्रेन चालक अवधेशकुमार राजेंद्र चौहान (रा. गुलबर्गा, सध्या रा. लोटे) याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अवधेशकुमार चौहान यांनी चालविलेली क्रेन (जीजे-१६/टीए-२९६६) ही खेडकडून लोटेकडे जात असताना अर्ध्या रस्त्यावर धोकादायकरीत्या उभी ठेवली होती. पाठीमागून आलेल्या दुचाकी (एमएच-०४/जेवाय-८६९७) ची त्या क्रेनला जोरदार धडक बसली.

अपघातात दत्ताराम मोहिते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.
या घटनेची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित कदम यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार म्हणून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *