खेड : मुलाकडून जन्मदात्या बापावर ॲसिड हल्ला, मंगेश देवळेकर विरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

खेड तालुक्यातील सुसेरी नं ०२ खालचीवाडी येथे मुलाने आपल्या वडिलांवर ॲसिड केल्याची धक्कादायक घटना ५ मे रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली. जखमी वडिलांनी उपचार घेतल्यानंतर १० मे रोजी पोलिसात तक्रार दाखल केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हिरु देवळेकर (६२, रा. सुसेरी नं ०२ खालचीवाडी) हे त्यांच्या घरी असताना त्यांचा मुलगा मंगेश अनिल देवळेकर (२३) याने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने वडिलांच्या अंगावर आणि चेहऱ्यावर ॲसिड फेकले. या हल्ल्यात अनिल देवळेकर यांच्या डोळ्याला, ओठाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.


घटनेनंतर अनिल देवळेकर यांनी तातडीने उपचार घेतले. उपचारानंतर त्यांनी १० मे २०२५ रोजी खेड पोलीस ठाण्यात जाऊन आपला मुलगा मंगेश देवळेकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

पोलिसांनी मंगेश देवळेकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२४(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *