Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

खेड : व्यावसायिकाला मारण्याच्या धमकीसह 10 लाखांच्या खंडणीची मागणी

banner 468x60

खेड तालुक्यातील मौजे बोरज येथील एका व्यावसायिकाला, त्याने दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

आरोपींनी फिर्यादीकडून १ लाख रुपये स्वीकारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत विशाल विवेक घोसाळकर (३८, व्यवसाय शेती/व्यापार, रा. बोरज घोसाळकरवाडी, ता. खेड) यांनी शनिवारी, १२ एप्रिल रोजी खेड पोलिसात फिर्याद दिली आहे.


फिर्यादीनुसार, घोसाळकर यांनी खेड तहसील कार्यालयात एका केमिकल कंपनीकडून मौजे बोरज येथील गट क्रमांक ७०७ मध्ये बेकायदेशीररित्या केमिकल उघड्यावर टाकले जात असल्याची तक्रार दाखल केली होती.


ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी १) परेश उदय शिंदे (रा. बोरज), २) सुरज सुरेंद्र पडयाळ (रा. बोरज) आणि ३) सुरज दिलखुश तांबे (रा. निगडे, ता. खेड) यांनी फेब्रुवारी २०२५ ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत संगनमत करून फिर्यादी घोसाळकर यांना धमकावण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांच्या (एम.एच. ०८ बी.सी. २२६६) या गाडीतून येऊन घोसाळकर यांना ‘कोणत्या ना कोणत्या खोट्या केसमध्ये अडकवू’, ‘तुमच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करू’ अशी धमकी दिली. तसेच, ‘आमच्या मुंबई-पुण्यात गँग आहेत, एक गँग बोलावली तर तुम्हाला ठार करू,’ अशी जीवे मारण्याची धमकीही दिली.


तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी १० लाख रुपयांची व दरमहा १० हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडून १ लाख रुपये स्वीकारले आहेत.
या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विशाल घोसाळकर

यांनी शनिवारी सकाळी १०:५७ वाजता खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०८ (२) (३) (खंडणी), ३५२ (धमकी देणे) तसेच कलम રૂ११(૨), રૂ११(રૂ), રૂ(4)) गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *