खेड : भोस्ते घाटात मालवाहू टँकर दरीत कोसळला, चालक बचावला

Screenshot

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मालवाहू टँकर दरीत कोसळला. ब्रेक निकामी होवून रिव्हर्स घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला. अपघातात चालक सुदैवाने बचावला असून टँकरचे नुकसान झाले आहे.

banner 728x90 banner 728x90

मुंबईहून चिपळूणच्या दिशेने टँकर जात असताना भोस्ते घाटात अचानक ब्रेक निकामी झाला. टँकर रिव्हर्स घेत असताना थेट दरीत कोसळला. अपघाताची खबर मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

टँकरमधील रसायन इतरस्त्र पसरल्याच्या शक्यतेने यंत्रणांची धावाधाव सुरू झाली. मात्र टँकरमधील रसायन बाहेर पडले नसल्याची बाब निदर्शनास येताच सार्‍यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *