Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

हर्णे : बंदरात बोटीवरील तांडेलचा समुद्रात बुडून मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे बोटीवर तांडेल म्हणून काम करणाऱ्या एका ४६ वर्षीय खलाशाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. महेश जनार्दन पाटील (रा. खारपाडा माहीम, जि. पालघर) असे मृताचे नाव असून, त्यांचा मृतदेह सोमवारी सकाळी हर्णे किनारी तरंगताना आढळून आला.

banner 728x90 banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, मयत महेश पाटील हे हर्णे येथील मोरेश्वर कानू चोगले यांच्या बोटीवर तांडेल म्हणून काम करत होते. रविवारी (१८ जानेवारी) बोटीचे कलरकाम पूर्ण झाल्यानंतर बोट समुद्रात नेऊन उभी करण्यात आली होती. त्यानंतर बोटीचे मालक घरी गेले होते. रात्री ११ ते १ च्या सुमारास बोटीवरील दुसरे तांडेल दिनेश अनिल धोपावकर यांनी बोट मालकांना फोन करून माहिती दिली की, महेश पाटील हे दारूच्या नशेत बोटीवर आले होते, मात्र आता ते बोटीवर दिसत नाहीत. या माहितीनंतर बोट मालकांनी तातडीने हर्णे बंदर गाठले आणि रात्रभर त्यांचा शोध घेतला, परंतु अंधारामुळे काहीच थांगपत्ता लागला नाही.


दुसऱ्या दिवशी, सोमवार १९ जानेवारी रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास शोध घेत असताना, महेश पाटील यांचा मृतदेह हर्णे बंदराजवळील समुद्राच्या पाण्यात तरंगताना दिसून आला.

त्यांना तातडीने बाहेर काढून दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. ​या घटनेबाबत दापोली पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेश पाटील यांना दारूचे व्यसन होते आणि त्या नशेतच त्यांचा पाय घसरून ते समुद्रात पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *