खेड तालुक्यातील फुरूस येथे टेलरिंग दुकानाच्या आडून बेकायदेशीर गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहिद अब्दुल कादिर परकार (वय ५१, रा. फुरूस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ₹१०,७२० किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
रविवारी सायंकाळी उशिरा दापोली पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी ‘विमल’ नावाचा नशाकारक आणि आरोग्यास अपायकारक गुटखा विनापरवाना विक्रीसाठी बाळगल्याचा आरोप परकार याच्यावर केला आहे.
या प्रकरणाची तक्रार सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ यांनी दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















