गुहागर : टॉवरला गळफास घेऊन 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

banner 468x60

गुहागर तालुक्यातील कोंढर काळसूर येथे बीएसएनएल टॉवरला गळफास घेऊन एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. पुरुषोत्तम उर्फ भावेश राजेश जाधव (वय २२, रा. कोंढर काळसूर, फौजदारवाडी, ता. गुहागर) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही घटना घडली. भावेश जाधव हा कोंढर काळसूर येथील बीएसएनएल टॉवरजवळ गेला आणि त्याने अज्ञात कारणावरून टॉवरच्या अँगलला दोरीने गळफास लावून घेतला. स्थानिकांना तो या अवस्थेत दिसल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.


या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी ४ वाजून १४ मिनिटांनी करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. भावेश जाधवने आत्महत्या का केली, याचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कोंढर काळसूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *