दाभोळ : येथील भाजीचे प्रसिद्ध व्यापारी विठ्ठल पदुकले यांचे निधन

banner 468x60

दाभोळ टेमकरवाडी येथील भाजी मार्केटमधील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध व्यापारी विठ्ठल गोपाळ पदुकले (वय ७३) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.


त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि सर्वांशी आत्मीयतेने वागणारा होता. ते हनुमानाचे निस्सीम भक्त म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच ग्रामस्थ, व्यापारीवर्ग तसेच समाजातील विविध स्तरांतील लोकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले व कुटुंबीयांचे सांत्वन केले.


त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगे, मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वाशिष्ठी स्मशानभूमीत असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


त्यांच्या निधनानिमित्त दाभोळ बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी वर्गाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *