रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ आणि दापोलीमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दाभोळमध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. दाभोळमधील मतदारांनी सकाळी ७:३० वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. दुपारी १२:३० वाजेपर्यंत सुमारे ३५ टक्के मतदानाची नोंद झाली असून, संपूर्ण दिवसातील एकूण मतदान 56.50 टक्क्यांपर्यंत पोहोचले.
दाभोळमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण 56.50 टक्के मतदान झालं आहे. मतदानाचा हा वाढता टक्का पाहता निकालात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दाभोळ जिल्हा परिषद गटासाठी भाजपकडून स्मिता जावकर शिवसेनेकडून साधना महाजन यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दापोलीतील जालगावमध्ये जिल्हा परिषद गटातून भाजपकडून अक्षय फाटक तर शिवसेनेकडून किशोर देसाई यांच्यामध्ये लढत झाली.
ही निवडणूक गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कदम यांचं नेतृत्व या गटात पणाला लागले असून,साधना महाजन आणि किशोर देसाई यांच्या विजयासाठी खुद्द कदम यांनी ताकद लावली आहे.
या निवडणुकीत खरी रंगत आली आहे ती दाभोळमधील दुपारनंतर मतदानाचा वेग वाढलेला पाहायला मिळाला. वाढलेली ही टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा आता दाभोळ परिसरात रंगू लागली आहे. आता या चुरशीच्या लढतीत मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मतमोजणी उद्या सकाळी १० वाजता सुरू होणार असून, मतदार आणि राजकीय पक्ष या निकालाकडे लक्ष ठेवतील. दाभोळ आणि दापोलीतील ह्या गटांमध्ये निवडणूक हॉट सीट मानली जात असल्याने निकालाने जिल्हा परिषदेच्या रूपरेषेत महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













