संगमेश्वर कोळंबे येथील स्टॉपवर रस्त्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या स्वाराला डंपर चालकाने चिरडल्याची घटना नुकतीच घडली आहे.
या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक डंपर घेवून फरार झाला आहे. ही घटना १ वाजण्याच्या सुमारास घडली. मुजीब जाफर सोलकर (५०, कुरधुंडा, मुस्लीम मोहल्ला संगमेश्वर) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
मुजीब सोलकर हे कोळंबे येथे रस्त्याच्याबाहेर दुचाकी उभी करून बोलत होते. याच दरम्यान संगमेश्वरच्या दिशेने जाताना डंपर चालकाने सोलकर यांना रस्त्याबाहेर जावून उडवले.
एवढंच नव्हे तर अपघातानंतर त्याने डंपर सुसाट वेगाने संगमेश्वरच्या दिशेने पळवला, कोळंबे ग्रामस्थांना याची माहिती मिळताच ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी डंपर चालकाचा पाठलाग केला मात्र तो दिसून आला नाही. नंबर प्लेट नसल्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण होते.
अपघाताची माहिती मिळताच कुरधुंडा येथील मुस्लीम मोहल्ल्यातील बांधव मोठ्या संख्येने जमा झाला आहे. या अपघाताची खबर संगमेश्वर पोलीसांना मिळताच संगमेश्वर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहीतीनुसर ग्रामस्थांनी डंपर पकडला आहे. मात्र चालक फरार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















