दापोली : संत परंपरेचा विसर पडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास – डॉ. प्रशांत परांजपे

banner 468x60

दापोली तालुक्यातील ज्ञानविकास मंडळ केळशी या वाचनालयाच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर प्रशांत परांजपे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रमाचे आयोजन केळशी येथे करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्री समर्थ दासबोधाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

banner 728x90 banner 728x90


याप्रसंगी बोलताना डॉक्टर प्रशांत परांजपे यांनी संत साहित्याचा आणि त्यांच्या शिकवणीचा विसर पडल्यामुळे आज पर्यावरणाचा ऱ्हास होत असून मराठी साहित्य आणि पर्यावरण याच्या संवर्धना करिता युवकांनी सक्षमपणे सहभागी होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केलं.
साहित्य, पर्यावरण आणि युवा पिढी या विषयावर ज्ञानविकास मंडळ वाचनालयाच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त डॉ . परांजपे यांनी वाचकांशी संवाद साधला.
वाचाल तर वाचाल या न्यायानुसार निसर्ग वाचन हा एक महत्त्वाचा विषय असल्याचे देखील त्यांनी या प्रसंगी नमूद केल.


अभिजात मराठी दर्जा मिळालेल्या आपल्या मातृभाषेचे रक्षण करणे आणि आपल्या निसर्गाला देखील प्रचंड असा अभिजाततेचा दर्जा आहे; तो अबाधित राखण याकरता युवकांनी मातृभाषा संवर्धन आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये अभ्यास करणे आणि कृतिशील होणं या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी विस्तृत अस विवेचन केलं.


बाराव्या व्या शतकातील लीळाचरित्रात देखील पर्यावरण संवर्धनाचे दाखले देण्यात आले आहेत इथपासून ते
संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम, संत एकनाथ ,संत नामदेव , संत गाडगे महाराज या संतांची पर्यावरण विषयीची शिकवण आम्ही विसरलो. मंदिरामध्ये तल्लीन होऊन तुकोबांचे भजन गायले जाते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मात्र त्याचा अंगीकार करण्याला आम्ही विसरत आहोत .


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधा मध्ये पंचमहाभूतांचे दाखले देत त्यांच्या संवर्धनाचा संदेश दिला असतानाच ज्या रामदास स्वामींनी आपल्या छत्रपती शिवरायांना आशीर्वाद दिला त्या शिवरायांची पर्यावरण नीती अर्थात आज्ञापत्राचा अभ्यास जर आपण केला आणि प्रत्येक युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र कृतीत उतरवलं तर उद्याचा भविष्यकाळ सुसह्य असेल नाहीतर प्रचंड अशा विध्वंसाला सामोरे जावं लागेल. अशा भीषण सत्याची जाणीव डॉक्टर परांजपे यांनी केळशी येथील आपल्या व्याख्यानादरम्यान करून दिली.
उपस्थित होते सूत्रसंचालन कार्यवाह केदार जोशी यांनी केले तर अध्यक्षीय समारोप ग्रंथालयाच्या अध्यक्ष शिला दिलीप कोठारी यांनी व्यक्त केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी उपाध्यक्ष सुभाष लाड, सदस्य.सुयोग खरे, भरत वर्तक, सल्लागार सुजाता धर्माधिकारी मॅडम.पत्रकार शेट्टे, वारे सत्कार मुर्ती श्रीमती करंदीकर, श्रीमती बोहरा,माजी ग्रंथपाल अश्विनी जोशी,रोहिणी महाजन केतकर ग्रंथपाल स्मिता महाजन सहाय्यक स्वप्नाली मिसाळ ,रश्मी करंदीकर , दापोली तालुका वाचनालयाच्या ग्रंथपाल नेत्रा करमकर तसेच गावातील वाचक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *