चिपळूण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील एकूण १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषद गटातील ५ तर पंचायत समिती गणातील ८ उमेदवारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराची अनामत वाचू शकली नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील तब्बल ३ उमेदवारांची अनामत जप्त झाल्याने आमदार शेखर निकम यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद गटातील अनामत जप्त उमेदवार :
• गीता जाधव (वंचित – कळवंडे)
• अमिता मोडक (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार – शिरगाव)
• नीलेश अनंत चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार – उमरोली)
• योगेश यशवंत खांडेकर (अपक्ष – उमरोली)
• विकास भागोजी डिके (बसपा – कोकरे)
पंचायत समिती गणातील अनामत जप्त उमेदवार :
• मुमताज दलवाई (काँग्रेस – कळवंडे)
• महेश महाडिक (ठाकरे सेना – पेढे)
• विलास तांदळे (ठाकरे सेना – अलोरे)
• फैसल सय्यद (अपक्ष – वेहळे)
• सागर सावंत (ठाकरे सेना – सावर्डे)
• सायली बंगाल (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार – गुढे)
• बुद्धदास सकपाळ (बसपा – वहाळ)
• अर्चना रसाळ (अपक्ष – कुटरे)
अनामत रक्कम वाचवण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक अष्टमांश (1/8) मते मिळवणे आवश्यक असते. आवश्यक मतसंख्या न मिळाल्याने या १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
या निकालामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असून, प्रमुख पक्षांनाही मतदारांनी दिलेला संदेश स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















