दापोली : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, दाभोळ-दापोलीत दोन भाजप दोन शिवसेना आमने-सामने, जिल्हा परिषदेसाठी २४ तर पंचायत समितीसाठी ५६ उमेदवारी अर्ज दाखल, आजपासून अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, चुरशीची लढत

banner 468x60

दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्व प्रमुख पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटांसाठी २४, तर १२ पंचायत समिती गणांसाठी तब्बल ५६ उमेदवारी अर्ज निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

banner 728x90 banner 728x90

अनेक ठिकाणी एकाच पक्षाचे दोन-दोन उमेदवार असल्याने युती, AB फॉर्म आणि बंडखोरी हे या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे ठरत आहेत.


दरम्यान, उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून कोळबांद्रे जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवार कमलाकर आंग्रे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. यामुळे या गटातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनेक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे दोन दोन उमेदवार पाहायला मिळत आहेत. अर्थात हे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतील मात्र दापोलीच्या राजकारणात युती आणि AB फॉर्मबद्दल संभ्रम असल्याबद्दल काळजी घेतली आहे. जर तर वर सर्वानी निवडणुकीत सेफ राहावं यासाठी अपक्षही अर्ज भरला आहे. दापोली जालगावमध्ये जिल्हा परिषदसाठी श्रीराम इदाते – अपक्ष, किशोर देसाई – शिवसेना, अक्षय फाटक – भाजपा, मिनल भाटकर – उबाठा, विकास मेहता – अपक्ष, कोळबांद्रे सलीम खोत – काँग्रेस, प्रभाकर गोलांबडे – शिवसेना, राजाराम रसाळ – उबाठा हे उमेदवार आहेत तर दाभोळमध्ये शिवसेनेनकडून दोन अर्ज भरले असून ज्यामध्ये नम्रता प्रदीप तोडणकर आणि साधना मिहीर महाजन यांनी देखील भरला आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसात नेमकं काय होणार अर्ज माघारी कोण घेणार आणि AB फॉर्मवर कोणाला मिळणार याबाबत सध्या रस्सीखेच सुरु आहे.

जिल्हा परिषद केळशी नरेंद्र करमरकर – उबाठा, गुणाजी गावणुक – उबाठा, जितेंद्र जाधव – बसपा, नितीन दुर्गवळे – शिवसेना, प्रसाद पाटेकर – अपक्ष, श्रीकांत मुगंशे – काँग्रेस, मकरंद म्हादलेकर – भाजपा

पालगड शुभांगी खोचरे – उबाठा, नेहा जाधव – राष्ट्रवादी, मिनाक्षी शेडगे – शिवसेना

हर्णै शितल जाधव – राष्ट्रवादी, ऐश्वर्या धाडवे – शिवसेना

जालगाव श्रीराम इदाते – अपक्ष, किशोर देसाई – शिवसेना, अक्षय फाटक – भाजपा, मिनल भाटकर – उबाठा, विकास मेहता – अपक्ष, कोळबांद्रे सलीम खोत – काँग्रेस, प्रभाकर गोलांबडे – शिवसेना, राजाराम रसाळ – उबाठा

दाभोळ स्मिता जावकर – भाजपा, नम्रता तोडणकर – शिवसेना, रत्ना बहिरमकर – उबाठा, साधना महाजन – शिवसेना

पंचायत समिती केळशी संदीप चिखले – शिवसेना, दिनेश मालप – उबाठा, महेंद्र रेवाळे व तुषार रांगले – राष्ट्रवादी, जुईकर मोहल्ला मिलिंद खैरे – अपक्ष, संतोष जगदाळे – अपक्ष, जितेंद्र जाधव – बसपा, सुरेश झिमण – अपक्ष, अजिंक्य दळवी – भाजपा, रविंद्र धाडवे – उबाठा, रविंद्र मांडवकर – अपक्ष, उन्मेष राजे – शिवसेना, विनोद लयाळ – अपक्ष,

पालगड अवधुत कदम – अपक्ष, रमेश चव्हाण – उबाठा, गणेश निवळकर – अपक्ष, संदीप पवार – बसपा, राजेंद्र फणसे – शिवसेना, रमा बेलोसे व सुशांत बेलोसे – राष्ट्रवादी, जनार्दन हळदे – उबाठा, खेर्डी शुभांगी खोचरे – उबाठा, साक्षी गोलांबडे – शिवसेना, ॲड. अक्षता जाधव – उबाठा, सुचिता महाडीक – शिवसेना, गिम्हवणे – आर्वा आरेकर – भाजपा, सुवर्णा खळे – शिवसेना, अस्मिता बांद्रे – उबाठा, कावेरी माने – राष्ट्रवादी

हर्णै आशा जाधव – शिवसेना, तुळसा जाधव – राष्ट्रवादी, विद्या वासावे – भाजपा, जालगांव श्रीराम इदाते – भाजपा, मंगेश पवार – शिवसेना, शैलेश पांगत – उबाठा, अक्षय फाटक – अपक्ष, मंगेश मोरे – काँग्रेस, विकास लिंगावळे-अपक्ष, टेटवली रविंद्र घडवले – उबाठा, अमित तांबे – राष्ट्रवादी, निलेश शेठ – शिवसेना, कोळबांद्रे श्रावणी कदम – भाजपा, रत्ना बहिरमकर – उबाठा, ममता शिंदे – शिवसेना, पांगारी तर्फे हवेली नरेश घरटकर – शिवसेना, प्रकाश मोरे – बसपा, संजय रामाणे व मुजीब रूमाणे – उबाठा, बुरोंडी अंकिता घुबडे – शिवसेना, पुनम पांदे – भाजपा, स्वप्नाली साठे – भाजपा,

दाभोळ – सारिका उजाळ- राष्ट्रवादी, फरिदा खान – उबाठा, नम्रता तोडणकर, संध्या पालकर – शिवसेना, अनुष्का महाडीक-मनसे असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दि. २३, २४ व २७ जानेवारी हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखा असून यामध्ये युती होणार की महायुती किंवा महाआघाडी होणार हे समजणार असून त्यानंतरच प्रचाराचा धुरळा मोठया प्रमाणात तालुक्यात उडणार आहे.

दापोलीत निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली असून जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेना, उबाठा, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा व अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. केळशी, पालगड, हर्णै, जालगांव, दाभोळ व कोळबांद्रे गटांमध्ये प्रमुख पक्षांनी ताकद पणाला लावली असून अनेक ठिकाणी बंडखोरीमुळे बहुरंगी लढतीचे चित्र आहे.

केळशी, पालगड, हर्णै, जालगाव, दाभोळ, कोळबांद्रे, गिम्हवणे, पांगारी तर्फे हवेली आदी गणांमध्ये शिवसेना, उबाठा, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा व अपक्ष उमेदवारांमध्ये थेट लढती पाहायला मिळणार आहेत.

अर्ज माघारीकडे सर्वांचे लक्ष

दि. २३, २४ व २७ जानेवारी या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. या काळात युती, महायुती किंवा महाआघाडी याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून, नेमके कोण उमेदवार मैदानात राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरच दापोली तालुक्यात प्रचाराचा धुरळा मोठ्या प्रमाणात उडण्याची शक्यता आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, दापोलीतील ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी दिशा ठरवणारी ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *