दापोली : वराडकर बेलोसे महाविद्यालयाचा १२ वी निकाल जाहीर, वाणिज्य शाखेचा निकाल ८६.२२ टक्के, कला शाखेचा निकाल ९७.२९ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ८१.८१ टक्के

banner 468x60

दापोली शहरातील सर्वात जुने आणि अल्प फीमध्ये दर्जेदार शिक्षण देणारे वराडकर बेलोसे महाविद्यालय यंदाही बारावीच्या परीक्षेत यशाची घोडदौड कायम राखण्यात यशस्वी ठरले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये पार पडलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखांतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

वाणिज्य शाखेचा निकाल ८६.२२ टक्के

या शाखेत प्रभात पंकज केळसकर (४५७ गुण – ७६.७७%) याने प्रथम क्रमांक पटकावला. मॅलिसा संदीप बांद्रे (४५४ गुण – ७४.५०%) दुसऱ्या तर श्रुति संतोष खळे (४३२ गुण – ७२.००%) तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

कला शाखेचा निकाल ९७.२९ टक्के

अनुजा किसन मळेकर (४५४ गुण – ७५.६७%) हिने प्रथम, नेहल निलेश पवार (४५१ गुण – ७५.१७%) हिने दुसरा आणि वेदांत विनोद जालगावकर (३७७ गुण – ६२.८३%) ह्या विद्यार्थ्याने तिसरा क्रमांक पटकावला.

विज्ञान शाखेचा निकाल ८१.८१ टक्के

या शाखेत आदिती किरण काशिकर (३७६ गुण – ६२.६७%) ही प्रथम क्रमांकावर राहिली. त्यानंतर पूर्वा प्रदीप गणवे (२९८ गुण – ४९.६७%) आणि राबिया अब्दुल्ला मुकादम (२८९ गुण – ४८.१७%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.

या यशाबद्दल बोलताना प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड म्हणाले, “वराडकर बेलोसे महाविद्यालयात प्रवेशासाठी अत्यंत कमी फी आहे. शासनाकडून व इतर स्रोतांकडून मिळणाऱ्या निधीची मर्यादा असूनही संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना विविध सुविधा देण्यात आल्या. गतवर्षी NAAC कडून महाविद्यालयाला ‘B+ ग्रेड’ प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय शिस्तबद्ध शिक्षण, मार्गदर्शन आणि शिक्षकांच्या मेहनतीला जाते.”

या निकालाबद्दल आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन चे सभापती. धनंजय यादव, उपसभापती. प्रियदर्शन बेलोसे, कार्यवाह डॉ. दशरथ भोसले, संचालिका जानकीताई बेलोसे आणि इतर संचालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *