दापोली तालुक्यातील टेटवली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे उमेदवार निलेश शेठ यांनी दणदणीत विजय मिळवत संपूर्ण तालुक्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान पटकावला आहे. हा विजय म्हणजे जनतेने त्यांच्या कार्यावर, निष्ठेवर आणि नेतृत्वावर टाकलेला ठाम विश्वास आहे. पंचायत समितीमध्ये सर्वाधिक मताधिक्य घेऊन टेटवली गणाचे शिवसेनेचे उमेदवार निलेश शेठ यांची बाजी मारली तब्बल 3460 मातांनी विजय मिळवला आहे.
वाकवली गावचे सरपंच म्हणून कार्यरत असताना निलेश शेठ यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव काम केले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लक्ष दिले आणि प्रत्यक्ष कामातून जनतेचा विश्वास संपादन केला.
निलेश शेठ हे कडवट शिवसैनिक असून शिवसेनेच्या विचारधारेशी अखंड निष्ठा राखणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. ते महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नाम. योगेशदादा कदम यांचे विश्वासू शिवसैनिक* मानले जातात. संघटन मजबूत करणे, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवणे आणि प्रत्येक संघर्षात ठामपणे उभे राहणे—हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.
ते केवळ राजकारणी नसून एक समाजसेवक आहेत. सर्वसामान्यांच्या हाकेला तत्काळ धावून जाणारे, गरजू नागरिकांच्या अडचणी स्वतःच्या समजून घेणारे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कोणताही भेदभाव न करता त्यांनी नेहमीच समाजहिताला प्राधान्य दिले.
टेटवली पंचायत समिती गणातील जनतेने दिलेला हा प्रचंड कौल आगामी काळात विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकहिताच्या कारभाराला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. निलेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली टेटवली गणासह संपूर्ण दापोली तालुक्याचा विकास अधिक गतिमान होईल, अस शेठ यांनी सांगितले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















