दापोली : उपजिल्हा रूग्णालयात पार्किंग व्यवस्थे अभावी रूग्णांना त्रास

banner 468x60

दापोलीत उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारामध्ये अनेक खासगी गाडया या पार्किंग केलेल्या असतात. त्यामुळे रूग्णवाहिका तसेच रूग्णांना उपजिल्हा रूग्णालयात जाण्यास अडचण निर्माण होत आहे.

दापोली उपजिल्हा रूग्णालयाचे सध्या श्रेणीवर्धन करण्याचे काम सुरू असून त्यासाठी एक नवी इमारत सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीच्या बाजूला उभी केली जात आहे. त्यामुळे रूग्णालयाच्या आवारातील एक बाजू ही पूर्णपणे बंदिस्त झाली आहे. तरी दुसऱ्या बाजूला उपजिल्हा रूग्णालयाचे मुख्य इमारतीचे प्रवेशव्दार तसेच अतिदक्षता विभागाचे प्रवेशव्दार आहे.

या प्रवेशव्दाराच्या समोरच रूग्णांना भेटायला येणारे नातेवाईक पेशंट हे आपल्या गाडया पार्किंग करून ठेवत आहेत. त्यामुळे संवेदनशील रूग्ण किंवा अपघातग्रस्त रूग्णाला आणताना मोठया प्रमाणात अडचण निर्माण होते.

अनेकवेळा रूग्णांना मुख्य व्दारावर उतरवून तिथून उचलून रूग्णालयात नेण्याची वेळ ही पेशंटच्या नातेवाईकावर येते. त्यामुळे उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रशासनाने या पार्किंगवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *