Breaking News
खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा

दापोली : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली येऊन तरुणाचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील करंजाळी येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली येऊन कन्हैया लकडू वनवासी (35) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकरणात ट्रॅक्टर चालक राजेश कमला वनवासी (36, मूळ रा. सराई मरेज हादिया, जिल्हा इलाहाबाद – उत्तर प्रदेश, सध्या करंजाळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90


या बाबत फिर्याद रामबहादूर नंदलाल वनवासी यांनी पोलिसांत नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ट्रॅक्टर चालक राजेश वनवासी हा चिरे भरलेली ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरवरून तीव्र उताराच्या कच्च्या सार्वजनिक रस्त्याने अवाजवी वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता.


याचवेळी ट्रॅक्टरमध्ये शेजारी बसलेला कन्हैया वनवासी तोल जाऊन खाली पडला आणि ट्रॉलीच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक राजेश वनवासी याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *