दापोली : तरुणाची आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील कर्दे साखळेवाडी येथे नरेश सुरेश भुवड ( 33) राहणार कर्दे साखळेवाडी) याने आत्महत्या केल्याची घटना शनिवार 4 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

banner 728x90 banner 728x90

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्थानकात खबर देणारे रमेश पांडुरंग भुवड (61) हे शनिवार 4 जानेवारी रोजी सकाळी 5:45 वाजण्याच्या दरम्यान उठले असता त्यांचा पुतण्या घरातील हॉलच्या छताला असलेल्या लोखंडी चॅनलला पंचा बांधून गळफास लावून घेतलेला आढळून आला.

शुक्रवार 3 जानेवारी रात्री 10:15 ते शनिवार 4 जानेवारी सकाळी 5:45 या दरम्यान त्यांचा पुतण्या नरेश याने गळफास लावून घेतल्याचे त्यांनी दिलेल्या खबरी मध्ये म्हटले आहे.

आत्महत्या करण्याचे नक्की कारण समजू शकलेले नाही. दापोली पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सडकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *