दापोली : सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी

banner 468x60

दापोली तालुक्यात असलेला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात येणार आहे.

banner 728x90 banner 728x90

यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था (युनेस्कोने) या जलदुर्गाची पाहणी केली होती. त्यानुसार लागणाऱ्या सोयीसुविधा, बेकायदेशीर बांधकामे हटवणे, पाणी, शौचालय, पार्किंग आदी गोष्टीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

या सुविधा पूर्ण झाल्यास सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटनाच्यादृष्टीने जागतिक पातळीवर जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सिंह, बांधकाम विभाग, पुरातत्त्व विभाग, प्रांताधिकारी, तहसीलदार आदींनी हर्णे किल्ला आणि परिसरामध्ये काय सुविधा देता येतील?

याविषयी पाहणी केली. दापोली शहरापासून हर्णे गावातून या किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक उपलब्ध आहे. हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

या किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साईट दर्जा देण्याच्यादृष्टीने युनेस्को संस्थेने नुकतीच या किल्ल्याची पाहणी करून काही सुधारणा आणि सुविधा सुचवल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून येथील नियोजन आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने हर्णे आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. आता प्रशासनाकडून युनेस्कोला दिलेल्या शब्दाची पूर्तता करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *