दापोली : एसटी स्टँडसमोर किरकोळ अपघात, पिकअप टेम्पोची रिक्षेला धडक

banner 468x60

दापोली मध्यवर्ती एसटी बस स्थानकासमोर आज सकाळी झालेल्या एका अपघातात रिक्षाचं नुकसान झाले. मालवाहू पिकअप टेम्पोने रिक्षेला मागून दिलेल्या धडकेत सुदैवाने हानी झाली नाही.सकाळच्या वाहनांच्या वर्दळीच्या वेळेत एमएच 08 बीसी 2194 क्रमांकाच्या रिक्षेला मागून एका पिकअप टेम्पोने धडक दिली.

रिक्षेच्या मागील भागाचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षाचालक तसेच प्रवाशांना दुखापत झाली नसल्याची माहिती मिळते. अपघातानंतर काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली.

बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. दरम्यान, रिक्षाचालक आणि टेम्पोचालक यांच्यात नुकसानभरपाईबाबत चर्चा सुरू होती.दापोली एसटी स्टँड आणि मुख्य बाजारपेठ परिसरात नेहमीच वाहनांची गर्दी असल्याने चालकांनी अधिक काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *