Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : साखरपुड्याच्या दिवशीच दागिन्यावर डल्ला, 6 लाखांची चोरी

banner 468x60

आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या साखरपुड्याच्या तयारीतच एका कुटुंबाला धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले. शिवाजीनगर येथील ऐश्वर्या बंगला परिसरात राहणाऱ्या संगीता संदेश तलाठी यांच्या घरी ७ डिसेंबर रोजी झालेल्या मेहंदी कार्यक्रमादरम्यान सुमारे ६ लाख रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या पाटल्या चोरीला गेल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

banner 728x90 banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी यांच्या घरी साखरपुड्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. दुपारी साधारण ३ वाजता मेहंदी समारंभ सुरू झाला. मेहंदी काढताना हातातील सोन्याच्या पाटल्या सुरक्षित ठेवण्यासाठी तलाठी यांनी त्या ड्रेसिंग रूममधील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिल्या. यावेळी त्या प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी औषधं घेतली होती आणि त्यामुळं त्या काही वेळ झोपल्या.
तलाठी यांच्या हातावरील मेहंदी काढून झाल्यानंतर घरातील इतर महिलांना मेहंदी लावण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांची ये-जा असल्याने घरात वर्दळ होती. काही वेळाने तलाठी जाग्या झाल्यानंतर त्यांनी पाटल्या काढण्याचा विचार केला. मात्र ड्रॉवर तपासल्यावर पाटल्या जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात शोधाशोध केली असता त्या कोठेच न मिळाल्यामुळे चोरीचा संशय बळावला.


याबाबतची माहिती तात्काळ दापोली पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या वेळी घरात कोणाची ये-जा झाली, कोणत्या वेळेस काय घडले, याचा पोलीस तपास सुरू आहे.


दागिना चोरीची घटना साखरपुड्याच्या दिवशीच घडल्याने तलाठी कुटुंबात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या घटनेचा तपास सीसीटीव्ही फुटेज, पाहुण्यांची चौकशी आणि अन्य तांत्रिक पुरावे यांच्या आधारे पुढे नेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *