दापोली तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मार्फत आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये रामराजे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स दापोली मधील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे.

यामध्ये पूज्य साने गुरुजी कथाकथन स्पर्धेमध्ये कु. दीक्षा समीर जाधव बारावी कला हिने प्रथम क्रमांक तर निबंध व वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशस्वी संदीप मोरे बारावी कला तालुक्यात प्रथम व वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिची निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे, संस्थेच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे, रामराजे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक निर्बाण, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक हर्डीकर, संस्थेचे संचालक दिनेश जैन, चेतन जैन, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदिका राणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















