Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : रामराजे महाविद्यालयाचे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ शिबिर उत्साहात संपन्न!

banner 468x60

रामराजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे तालुक्यातील ओळगाव येथे आयोजित सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबिर उत्साहात पार पडले. सामाजिक भान, ग्रामविकास आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा सुंदर मेळ साधणारे हे शिबिर ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे अधिक यशस्वी ठरले.

उद्घाटन सोहळा दर्जेदार उपस्थितीत

banner 728x90 banner 728x90

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक हर्डीकर, समन्वयक प्रा. जालिंदर पाटील, गाव अध्यक्ष सुरेश कासेकर, उपसरपंच . अक्षता आग्रे, पोलिस पाटील नरेंद्र मांजरेकर आणि अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.

विषयतज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने

शिबिरादरम्यान अनिश पटवर्धन, प्रा. माधव गवाणकर, डॉ. तुषार लिंगायत, प्रा. कुणाल मंडलिक, पांडुरंग उबाळे,. महेंद्र जालगावकर यांनी आरोग्य, समाजाभिमुख उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित प्रभावी व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यांना दिशा दिली.

विद्यार्थ्यांकडून ग्रामस्वच्छता व विकासकामे

ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विविध विकासकामांमध्ये श्रमदान केले.
✔ बंधारे बांधकाम
✔ पाणवाटा, पाखाडी, विहिरी व तळी स्वच्छता
✔ मंदिर परिसर स्वच्छता
✔ जि.प. शाळेच्या परिसरातील स्वच्छता व सुशोभीकरण

या सर्व उपक्रमातून विद्यार्थ्यांनी ग्रामविकासाची प्रत्यक्ष शिकवण अनुभवली.

सक्रिय सहकार्यामुळे शिबिर यशस्वी

शिबिराच्या यशात कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष येसावरे, प्रा. अंकिता दळवी,–ओळगाव ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र मांडवकर, NSS विद्यार्थी प्रतिनिधी. साहिल केंद्रे व. समिक्षा चांदे यांचे विशेष योगदान लाभले.

महाविद्यालयाचे संस्थापक. संदीप राजपुरे आणि संस्थाध्यक्षा. स्मिताली राजपुरे यांचे मार्गदर्शन शिबिरभर लाभत राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *