Breaking News
खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा

दापोली : पंप हाऊस फोडून 52 हजारांच्या साहित्याची चोरी

banner 468x60

दापोली तालुक्यातील नवानगर तांबडीकोड येथे अज्ञात चोरट्याने पंप हाऊसचे कुलूप तोडून आत ठेवलेले सुमारे ५२ हजार ६०० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडली.

banner 728x90 banner 728x90

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ततीक्षा सुदर्शन गायकवाड (४४, रा. दापोली काळकाईकोड) यांच्या नवानगर तांबडीकोड येथील जमिनीमध्ये बांधलेल्या पंप हाऊसमध्ये चोरी झाली. अज्ञात चोरट्याने पंप हाऊसच्या सिमेंटच्या दरवाजाची कडी वाकवून व दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आत ठेवलेले कंपाऊंडसाठी वापरण्यात येणारे

४८ हजार रुपये किमतीचे लोखंडी ४ फूट उंच व ५० फूट लांबीचे तारेचे ८ बंडल, २००० रुपये किमतीचा पाण्याचे बोरिंगचा स्टार्टर, २४०० रुपये किमतीच्या १०० फूट लांबीच्या गुलाबी व केशरी रंगाच्या १ इंची मापाच्या दोन पाण्याच्या पाईप्स, २०० रुपये किमतीच्या दोन लोखंडी पहारी आणि १००० रुपये किमतीच्या एसीसी सिमेंटच्या ०३ बॅगा, असा एकूण ५२ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या चोरीची तक्रार ततीक्षा

गायकवाड यांनी दापोली पोलीस ठाण्यात ८ एप्रिल २०२४ रोजी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *