पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नागरिकांचा शाळेध घेण्यात येत असून, दापाली तालुक्यात दान पाकिस्तानी महिलांचे वास्तव्य आहे.
भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तींशी त्यांचे लग्न झाले असून, त्यांनी भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही. यातील एक महिला तालुक्यातील हर्णे येथे, तर दुसरी दापोली शहरात राहत आहे. दोघींनीही लग्नानंतर पाकिस्तानचे नागरिकत्व रद्द केले आहे.
त्यांच्याकडे पती-पत्नी म्हणून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पाउझ व्हिसाची मुदत फेब्रुवारीमध्ये संपली हाती. मात्र, त्यांना ता मार्चमध्ये पुन्हा मिळाला. या महिलांना भारताचे नागरिकत्व मिळावे यासाठी चार वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला आहे.
मात्र, त्यावर अद्याप काणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यांनी याबाबत पुन्हा चाकशी केली असता, आठ दिवसांत ता मिळेल, असे सांगण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















