दापोली : निलेश शेठ यांची पंचायत समिती दापोली शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी आणि मुख्य प्रतोद पदी निवड

banner 468x60

टेटवली पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य निलेश अशोक शेठ यांची पंचायत समिती दापोली मध्ये शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी तसेच मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90


ही निवड गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, त्यांच्या विश्वासास पात्र ठरत निलेश शेठ यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.निलेश शेठ यांनी आपल्या कार्यक्षमतेने, प्रामाणिकपणाने आणि जनसंपर्कातून टेटवली गणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामविकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, शिक्षण आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

त्यांच्या या कामगिरीची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर गटनेते व मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी दिली आहे.पंचायत समितीमध्ये त्यांच्या निवडीमुळे कामकाजात अधिक समन्वय, शिस्त आणि प्रभावी निर्णयप्रक्रिया निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे दापोली तालुक्यातील विकासकामांना नवीन उर्जेसह गती मिळेल आणि स्थानिक प्रकल्प जलद अंमलात येण्यास मदत होईल.

या निवडीमुळे टेटवली गणासह संपूर्ण दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी निलेश शेठ यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या विकासासाठी नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *