दापोली : नासा- इस्रो विद्यार्थी भेट चाळणी परीक्षेत चंद्रनगर शाळेचे यश

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा परिषद आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चाळणी परीक्षेत दापोली तालुकास्तरीय चाळणी परीक्षेसाठी जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेतील चार विद्यार्थ्यांची निवड झाल्याने चंद्रनगर परिसरातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

दरवर्षी रत्नागिरी जिल्हा परिषद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य विज्ञान तसेच बुद्धिमत्ता विषयांवर आधारित नासा-इस्रो भेट पात्रता परिक्षेचे आयोजन करण्यात येते.

नुकत्याच पार पडलेल्या केंद्रस्तरीय पात्रता स्पर्धेत तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेतील आरोही महेश मुलुख या विद्यार्थीनीने दापोली तालुकास्तरासाठी दुसरा क्रमांक पटकावला असून तालुकास्तरीय चाळणी परिक्षेसाठी चंद्रनगर शाळेतील. श्रेयश अनिल मुलुख,. मनस्वी वसंत आंबेलकर,. नीरजा मनोज वेदक या विद्यार्थ्यांचीही निवड झाली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, मानसी सावंत, बाबू घाडीगांवकर, रेखा ढमके यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी नुकतीच या शाळेस भेट देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. चंद्रनगर शाळेतील नासा-इस्रो परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष अनिल मुलुख, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मोहन मुळे, चंद्रनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव आदी अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *