दापोली : महोत्सव श्री 2025 ओंकार फिटनेस दापोलीच्या खेळाडूंचे दणदणीत यश

banner 468x60

दापोली येथील आझाद मैदानावर आयोजित दापोली महोत्सव श्री २०२५ शरीरसौष्ठव स्पर्धेत ओंकार फिटनेस, दापोलीच्या खेळाडूंनी आपली ताकद आणि कसब दाखवत स्पर्धेच्या फायनलमध्ये टायटल विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत जिल्हाभरातील अनेक नामवंत शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. ओंकार फिटनेस जिममधील खेळाडूंनी उत्कृष्ट सादरीकरण करत स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली.


स्पर्धेतील दापोली महोत्सव श्री मास्टर २०२५ हा मानाचा किताब श्री. प्रवीण कांगणे यांनी आपल्या नावे केला. त्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन करत सर्व प्रतिस्पर्धकांना मागे टाकले. त्यांच्या या यशामागे रत्नागिरी श्री शरीरसौष्ठवपटू ओंकार कोळेकर यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले.

तसेच ओंकार फिटनेस जिमच्या इतर खेळाडूंनीही विविध गटांत पदके पटकावत संघाची शान वाढवली.
विशाल जगदाळे, श्रेयस बांद्रे, ऋषिकेश धामणे, समीर सावंत, अमित जाधव, स्वयम् चांदणे, साई कुळे आणि प्रमोद मोरया यांनी Men’s Physique 2025, Dapoli Top 10 2025 तसेच महोत्सव श्री 2025 या गटांमध्ये यश संपादन केले.

या सर्व खेळाडूंना ओंकार फिटनेसचे मालक व प्रशिक्षक ओंकार कोळेकर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या मेहनती प्रशिक्षणामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *